तर, movie पाहायला घेतला and I was ashamed of myself for judging something from it's outer appearance. It was excellent...Nandu Madhav was tooooo good.... खरच हि अशी दूर दृष्टीची आणि विशिष्ठ ध्येयाने पछाडलेली माणसे आपल्या सारख्या पामरांच्या दृष्टीने पहिला तर, out of our league....Prof. फाळके english movie पाहून येतात काय आणि त्या वरून आपण पण अशीच 'हलती चित्र ' तयार करावीत असा त्यांना वाटता काय...पण सिनेमा खूप च positive attitude ने घेतला आहे, तो पाहून वाटता की फाळके न काही संकटा आली च नाहीत जणू...England ला गेल्यावर तिथे मराठी माणूस भेटणं, सगळ्या गोऱ्यांनी सुद्धा अगदी आपण हून मदत करणं, जरा too much ....
या सिनेमा मधला सगळ्यात सुरेख पात्र म्हणजे फाळक्यांच्या मागे नाही तर त्यांच्या हून ४ पावला पुढेच उभी राहणारी त्यांची पत्नी सरस्वती....हि हलती चित्र म्हणजे नक्की काय, ती कशी तयार होतात, कसली म्हणजे कसली हि माहिती जवळ नसताना हि घरातले शेवटचे राहिलेले ५९ रुपये नवर्याला देणारी...आणि हसत हसत त्याला प्रोत्साहन देणारी... बाप रे..एवढाच नाही, तर नवा बाळ होत असताना सुद्धा नवर्याला खुशाल परदेशात जाऊन देणारी, आपल्या विमा policies आणि दागिने हसत हसत नवऱ्याला काढून देणारी...खरी सहचारिणी...( मी जर त्यांच्या जागी असते, तर मुकाट्याने माझ्या नवऱ्याला secured जॉब शोधायला लावला असता, आणि पुढे वर्ष भर माझा कसा बरोबर आणि तुझं कसा चूक याच्यावर वाद घातला असता...)
आज अमेरिकेमध्ये येऊन scholarships, visa status,पैसे आणि हो स्वतः चे हि status maintain करताना कुठलीही रिस्क घ्यायला आम्ही तयार नाही आहे... ' महाजनो येन गतः सः पंथः ' सारखी आमची अजून हि चाकोरी मधून च वाटचाल चालू आहे...या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणून च सरस्वती बाईंचा वेगळेपण ठळक उठून दिसत आणि लक्षात हि राहते.. त्यामुळे चित्रपट सृष्टीचे जनक जितके दादा साहेब फाळके आहेत तितक्याच सरस्वतीबाई सुद्धा.. आणि movie पाहून मला मिळालेला एक मोठा lesson म्हणजे सरस्वती बाईंएवढी नाही तरी थोडी रिस्क घ्यायला काही हरकत नाही आणि नवऱ्यावर थोडा विश्वास टाकायला सुद्धा...:)