मध्ये कोणी तरी youtube वर 'अधांतरी' नावाची link पाठवली. Just another fwd म्हणून मी सवयी प्रमाणे त्याच्या कडे दुर्लक्ष केला... पण परवा mailbox clean करताना ती link पहिली आणि video सुरु केला, अधांतरी....
( मला कळतच नाही की की आज काल मी इतकी mechanical का झालेय.... पूर्वी छान काही वाचला, ऐकला की मैत्रीणीना FWD करणारी मी दुसऱ्यांनी FWD केलेल्या mails तितक्याच सहज पणे सहज trash मध्ये टाकतेय....)
Video सुरु झाला आणि मला वाटला की जणू काही दुसरी मी च सांगतेय माझी गोष्ट...Video होता परदेशात निघताना होणारी मनाची तगमग... visa stamping त्या नंतर ची गडबड, सगळ्यांचे निरोप घेणं, सगळी लगीनघाई डोळ्या समोर जशीच्या तशी दिसायला लागली मला...video पाहून rather ऐकून खूप senti झाले मी... पण मग मला वाटला, अरे या नाण्याला दुसरी पण बाजू आहेच की...
इथे पुढे शिकायला यायचा असा ठरवला तेव्हा चांगला अभ्यास करायचा आणि इथल्या slogging मधून बाहेर पडायचा एवढाच aim होता माझा...इथे आल्यावर पहिले काही दिवस तर मी मंदार काका कडेच होते..so, घरापासून लांब , सातासामुद्रापार आलेय असा feeling कधीच नाही आला मला..
आता हा, जेव्हा मी Houston ला राहायला आले तेव्हा घरापासून दूर राहण्याचा, घरात एकटा असण्याची सवय करून घेण्याचा हा माझा पहिलाच अनुभव... थोडा काय खूप त्रास झाला सुरवातीला... पण हळूहळू जाणवायला लागला, ही phase पण खूप सुंदर आहे..
मला असा नाही म्हणायचं की मला आई बाबांनी अगदी मोकळा सोडून दिला होता, हा पण एक कोशात बंद करून नक्कीच नव्हता ठेवला...चौकोनी, झापड लावलेला घर कधीच नव्हता आमचा...पण मी जे काही छोटे मोठे decisions घेतले त्यावर मत द्यायला माझे घरातले नक्कीच होते...
अमेरिकेत येऊन मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वताचे निर्णय स्वत घेणं...मी मुद्दाम च निर्णय स्वातंत्र्य म्हणत नाही आहे...कारण ते तर मला माझ्या घरी हि होता...but as I have to face consequences of the decisions, it made me responsible in a way.. या देशाने मला स्वावलंबन शिकवला आणि श्रमप्रतिष्ठा सुद्धा.फक्त लोकांकडून ऐकलेली, किंवा पुस्तकातच पाहायला मिळतील अशा माणसाना मी याच ४ महिन्यात भेटले..
अमेरिका श्रेष्ठ का भारत या वादात मला मुळीच पडायचा नाही आहे पण या अमेरिकेतल्या ४ महिन्यांनी मला खूप वेगळे अनुभव दिले आणि आणि माझ्या घर बाहेरचा वेगळा जग दाखवला हे मात्र नक्की....
Varada,
ReplyDeletepahila blog khupach chan lihila ahes..keep it up..maza pan mi lawakarach publish karanar ahe but of course ewadha changla nasel..